मुकरी सालार ०२ वर्षाकरीता तडीपार

shivrajya patra

 
सोलापूर : नागरीकांना दमदाटी व मारहाण करुन दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन खंडणी वसूल करणे, यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या वसीम उर्फ मुकरी अ. रहिम सालार (वय-३८ वर्षे) यास सोलापूर पोलीस आयुक्तालयाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार केलंय.

येथील विजापूर वेस चमन शहावली टेकडी सिद्धेश्वर पेठेतील रहिवासी वसीम उर्फ मुकरी अ. रहिम सालार याचेविरुध्द सन २००८, २०१०, २०१४, २०१५, २०१६, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये 

नागरीकांना दमदाटी व मारहाण करुन दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करुन खंडणी वसूल करणे, शासकीय नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणे, दरोडा टाकणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुकरी अ. रहिम सालार याच्याविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन, वसीम उर्फ मुकरी अ. रहिम सालार यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केलंय. त्यास तडीपार केल्यानंतर लातूर येथे सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

To Top