Type Here to Get Search Results !

कासेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घेतला लाभ

सोलापूर/शेख हमिद : शासनाच्या विविध योजनांचा लाभ संभाव्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं गुरुवारी, २४ एप्रिल रोजी  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.  पंचक्रोशीतील जवळपास ८० हून अधिक लाभार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला.

दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर जिल्हा परिषद शाळेत सकाळी दहा वा. ते सायंकाळी पाच वा. दरम्यान पार पडले. या शिबीरात उत्पन्न दाखले, रहिवाशी दाखले, जातीचे दाखले, संजय गांधी, श्रावण बाळ योजना या निराधार योजने बाबत अर्ज स्वीकृती व दाखले प्रदान करण्यात आले.  

या शिबिरामध्ये शासकीय विविध योजनाबद्दल माहिती देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना शासकीय योजनांमध्ये लागणारे शासकीय कागदपत्रे यांची पूर्तता करण्यात आली. यामधून विद्यार्थ्यांसाठी लागणारे अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, रहिवासी, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर तसेच रेशन कार्ड मध्ये नाव वाढ करणे, कमी करणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पीएम किसान नोंदणी अशा विविध प्रकारच्या शासकीय योजनांचे पूर्तता करण्यात आली. यामध्ये जवळजवळ 80 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी उपस्थित नायब तहसीलदार भंडारी, बोरामणी मंडल विभागाचे मंडल अधिकारी माळी, पुरवठा विभागाचे पठाण, शिंदे तसेच कासेगांव ग्राम महसूल अधिकारी आरिफ हुडेवाले, उळे गावचे ग्राम महसूल अधिकारी समाधान काळे, कासेगांव चे सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, ग्रामपंचायत सदस्य गावचे प्रतिष्ठित नागरिक नेताजी पाटील उपस्थित होते.

या शिबिरामध्ये कासेगांव, उळे, गंगेवाडी, उळेवाडी, वडजी परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि संभाव्य लाभार्थ्यांनी लाभ घेतला.