कुरेशी परिवारातील चौघा भावंडांसह ०५ जण तडीपार

shivrajya patra

सोलापूर : गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्यासह अन्य गुन्हे दाखल असलेल्या कुरेशी परिवारातील चौघा भावंडासह ०५ जणांना सोलापूर पोलीस आयुक्तालयानं ०२ जिल्ह्यातून तडीपार केलंय.

वाजीद म. हनिफ कुरेशी (वय ३४ वर्ष), रौफ म. हनिफ कुरेशी (वय- ४० वर्षे), अख्तर म. हनिफ कुरेशी (वय- २२ वर्षे), अरशद म. हनिफ कुरेशी (वय-२४ वर्षे) आणि  सिकंदर गनी शेख (वय-३१ वर्षे, सर्व रा.५३४ कुरेशी गल्ली, लष्कर, सोलापूर) अशी तडीपारांची नांवे आहेत. 

या सर्वांविरुध्द सन २०१४, २०१५, २०२४ आणि २०२५ या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून जनावरांची निर्दयतेने, क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे, गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. 

सदर बझार पोलीस ठाण्याकडून त्यांच्याविरुध्द तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तो पारित झाल्यावर त्यांना सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय.  तडीपारीनंतर सर्वांना विजापूर येथे सोडण्यात आलं आहे.

To Top