प्रथमच... ! अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार प्रकरणी कारवाईत स्थानबध्द

shivrajya patra

सोलापूर : सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीतील हरीदास शंकर गायकवाड (वय ५२ वर्षे) याला अत्यावश्यक वस्तू (एल.पी.जी.) चा काळा बाजार करणारी व्यक्ती म्हणून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्द करण्यात आलंय. सोलापूर शहर आयुक्तालयातील अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्ती या सदरखाली सोलापूर शहरातील ही पहिलीच कारवाई म्हणून पाहिली जातेय.

सलगर वस्ती लिमयेवाडी येथील मंजुनाथ नगरातील रहिवासी हरीदास गायकवाड हा सन २०२३ पासून स्वतः अवैध आर्थिक फायदा मिळविण्याकरीता, अवैधरित्या अत्यावश्यक वस्तुं म्हणजेच घरगुती वापराचा एलपीजी गॅस हा इंधन म्हणून अॅटोरिक्षामध्ये भरून गुन्हे करीत होता. त्याच्या अवैध व्यवसायावर सलगर वस्ती पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडून वेळोवळी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.

त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी, सन २०२४ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही, हरिदास शंकर गायकवाड याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. हरीदास गायकवाड याने घरगुती वापराचा एलपीजी हा अत्यावश्यक वस्तूमध्ये समाविष्ठ होत असताना, त्याचा घरगुती वापराचा एलपीजी इंधन म्हणून अॅटोरिक्षामध्ये भरण्याकरीता, काळाबाजार करून अवैधरित्या घरगुती वापरचा एलपीजी हा इंधन म्हणून अॅटोरिक्षामध्ये भरण्याचा उद्योग करीत करीत होता. फेब्रुवारी व मार्च २०२५ या कालावधीमध्ये गुन्हे शाखा, सोलापूर शहर व सलगरवस्ती पोलीस ठाणे यांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८६, २८७ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये ०२ गुन्हे दाखल केले.

त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना  हरीदास गायकवाड हा अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारी व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी, १४ एप्रिल रोजी त्याच्याविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-०२) यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे, सपोनि तुकाराम घाडगे (गुन्हे शाखा), एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ विनायक संगमवार, पोहेकॉ सुदीप शिंदे, पोशि विशाल नवले यांनी केली.

To Top