आमदार विजय देशमुख यांची अधिकाऱ्यांसमवेत चर्चा; दोन्ही उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास नेण्याची सूचना

shivrajya patra

सोलापूर : शहरातील प्रलंबित दोन्ही उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी आमदार विजय देशमुख यांनी मंगळवारी, येथील महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या दालनात, नॅशनल हायवे अधिकारी,भूमी संपादन विशेष अधिकारी व नगर रचना विभाग यांच्या समवेत बैठकीत चर्चा केली. 

सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपूलाचे काम प्रलंबित आहे. या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन पर्यंतच्या उड्डाण पुलाचे पूर्ण बाधित जागेचे हस्तांतरण मनपा कडून 25 मेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर नॅशनल हायवेकडून 02 महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्यासंबंधी आमदार विजय देशमुख यांनी अन्य संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. 

सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.

To Top