भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व संविधान वाचन

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वागीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी, याउद्देशाने दरवर्षी दि.08 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी, यांनी त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व कार्यालयांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशानुसार सहायक समाज कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या

 वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" या कार्यक्रमांतर्गत सोमवारी, 14 एप्रिल रोजी जयंतीनिमित्त पार्क चौक, सोलापूर येथे सकाळी 9 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, म.न.पा. आयुक्त  डॉ. सचिन ओंबासे,  पोलीस आयुक्त एम. राजकुमार,  पोलीस अधिक्षक सोलापूर अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संविधान वाचन करून बौद्ध वंदना करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ  सहायक आयुक्त समाज कल्याण श्रीमती सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांनी केले असून कार्यक्रमास सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण

 सोलापूर मनीषा फुले, संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सचिन कवले, व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी, तालुका समन्वयक, महामंडळाचे व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, समतादूत व वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजश्री कांबळे यांनी केले.

अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.

To Top