दूरदर्शीपणाच्या अभावातून राबविली जातेय मोहोळ शहरात पिण्याच्या पाण्याची पाईप आणि ड्रेनेज लाईन

shivrajya patra

मोहोळ/यासीन आतार : जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नेहमी चर्चेत असणाऱ्या मोहोळ शहरात पिण्याच्या पाण्याची पाईप आणि ड्रेनेज लाईन चर्चेत आहे. जवळपास ४५ हजाराहून अधिक लोकवस्तीसाठी सांडपाणी अंडरग्राउंड घेऊन जाणारी पाईपलाईन अवघ्या ४" व्यासाची अन् ०२ किलो वजनाची पाईप यालाच अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन हे सुबक नाव देण्यात आलंय. ही योजना दूरदर्शीपणाच्या अभावातून राबविली जात असल्याची जनसामान्यांची भावना दिसून येत आहे.

सुमारे ०५ दशकापूर्वी मोहोळ शहराला पाणीपुरवठा योजना सुरू झाली. तेव्हा छोट्या मोहोळसाठी मुख्य शहरातील मेन पाईप लाईन १ फुटांपेक्षा मोठी तर सबलाईन ६ "  ते ९" व्यासाची आहेत, मात्र आताची सुरू असलेली पाणीपुरवठ्याची पाईप लाईन ३" ते ४" व्यासाची आहेत. सांडपाण्यासाठी तत्कालिन गटारी १ ते २ फूट रुंदीच्या आहेत, आताच्या पाईप मधून शहराचे सांडपाणी वाहून जाईल का, हा संशोधनाचा मुद्दा बनतोय. 

नव्याने होऊ घातलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि सांडपाण्याची लाईन नियोजन शून्यतेतून आहे. त्यावर मोहोळ शहरातील सर्व पक्षीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते गप्प आहेत, त्यास सर्वांची जणू मूकसंमती आहे की काय असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

To Top