सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, सहसचिव डॉ. राजदत्त रासोलगिकर, प्राचार्य विठ्ठल एकमल्ली, दत्तात्रय शिंदे, प्रकाश साळवे, दाऊत आतार, सिद्धेश्वर अवघडे, संजयकुमार शिवशरण, नागेश सातपुते, राम गायकवाड, विठ्ठल मोरे, यशपाल आकाडे, महानंदा शिंदे, निर्मला मौळे, राजेंद्र सोरटे, सिद्धेश्वर भुरले, प्रिया कदम, शिवानंद चौगुले, आगतराव बनसोडे, एकोराम चौगुले, प्रवीण नाईकनवरे, पृथ्वी शिंदे, स्वप्नजा कसबे, प्रा. सचिन कांबळे, खंडू कोकरे, महादेव अवताडे, अभिजीत भंडारे, नीलकंठ अय्यर, शुभम इंगळे, उपेंद्र गायकवाड, प्रकाश कांबळे, गुंडीराम साठे, शुभम हिरेमठ, आनंद कोरे, सुनील स्वामी, मानाजी रणदिवे, भाऊराव पोतलकर, (अहिल्यानगर) सुरेखा गायकवाड, डॉ. श्रुतिका उडानशिव, इंजि. रसिका उडाणशिव, ऋतुराज ठोंबरे, जुल्फिकार बेलीफ, इंनुस बालगी, महिबूब तांबोळी आदी महासंघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. 
महानगरपालिकेच्या हिरवळीवर झालेल्या अभिवादन सभेत उपस्थित पदाधिकारी व सभासदांनी आपले विचार व्यक्त केले. या सभेचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांनी केले. शेवटी अशोक मोहरे यांनी आभार मानले.
