सोलापूर : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय पर्यटक व नागरिकांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकात मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पहेलगाम हल्ल्यांमध्ये सुमारे 26 नागरिकांच्या मृत्यू झाला. याची जबाबदारी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घेतलेली आहे. मोदी सरकारने पाकिस्तानला घरात घुसून दहशतवादाचा नायनाट करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम यांनी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला जिल्हाध्यक्ष मीनल दास यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.