पहेलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली ! दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची मागणी

shivrajya patra

सोलापूर : जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी अमानुष गोळीबार करीत निष्पाप भारतीय पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या भ्याड कृत्याचा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली निषेध आणि मृत भारतीय बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

विजापूर वेस येथे या भ्याड कृत्याचा मेणबत्ती पेटवून आणि पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. समस्त मुस्लिम मावळ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आम्ही सारे भारतीय एकोप्याने आणि बंधुत्व जपणारे आहोत, भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही करण्यात आली. 

याप्रसंगी  जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, राम गायकवाड, पोपट भोसले, बशीर सय्यद रिजवान दंडोती यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

To Top