शनिवारी बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळावा

shivrajya patra

सोलापूर : 'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास' समितीच्या वतीने, ०५ एप्रिल रोजी शनिवारी, बेरोजगारांचा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशा माहितीचे पत्र 'मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास' समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धीस दिले.

'मी सोलापूर, माझे सोलापूर परिवर्तन व विकास' समितीच्या वतीने, सोलापूरच्या विकासासाठी बाधित असलेला बेरोजगारी दूर करण्यासाठी भव्य रोजगार मेळावा शनिवारी,०५ एप्रिल रोजी १०:०० वाजता, पद्मशाली चौक येथील, महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, प्रसिद्ध उद्योजक आणि समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी सोलापूर शहरातील बेरोजगार युवक, युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध क्षेत्रातील कामगार वर्ग आणि गरजू लोकांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन विष्णू कारमपुरी यांनी केलं आहे. 

संपर्कासाठी भ्रमणध्वनी : ९८८१३०१७७७

To Top