सोलापूर : जिल्ह्यातील सर्वात मोठी अल्प संख्याक सहकारी संस्था भारत सहकारी गरमेंट ची सन २०२५-३० ची निवडणूक यंदा बिनविरोध झाली.
चेअरमन शफी भाई इनामदार यांचा नेतृत्वात २५ सभासदांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता, यात इब्राहिम जमादार, सत्तार तुरूप यांनी तर महिला मतदार संघात तसलिमा शेख यांनी माघार घेत बिन शर्त पाठिंबा दिला. विरोधक म्हणून मकबूल मोहोळकर, अहमद अली मोहोळकर आणी शकील कादरी यांनी देखील अर्ज दाखल केले होते. माजी महापौर आरिफ शेख, तौफिक शेख आणि शकील मौलवी यांनी मध्यस्थीनंतर ही निवडणूक अखेर अविरोध झाली.
नवीन संचालक
सर्वसाधारण मतदार संघ
१, शफी भाई इनामदार
२, गनी भाई पठाण
३, फाहिमोद्दीन शेख
४, वारीस कुडले
५, सफदर वळसंगकर
६,मोहि्योद्दीन मनियार
७, मुनाफ चौधरी
८, अयुब मोमीन
९, कय्युम इनामदार
१०, सलीम मुलाणी
११, मुदसर इनामदार
१२, मकबूल मोहोळकर
महिला मतदार संघ
१, चांद सुलताना शेख
२, यास्मिन शेख
इतर मागासवर्गीय
सलीम नदाफ
मागास वर्गीय
मुकुंद शिंदे
भटके जाती जमाती
विजय जाधव
