सोलापूर : महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि. 14 ऑगष्ट 2018 अन्वये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रयरेषेखालील भूमीहीन कुटुंबांना 4 एकर जिरायती व 2 एकर बागायती जमिन उपलब्ध करून देण्यात येते.
सदर योजनेंतर्गत मौजे पिरटाकळी ता. मोहोळ, जि. सोलापूर खालील तपशीलाप्रमाणे जमीन खरेदी करणेची प्रक्रीया सुरू आहे. खरेदी करावयाच्या जमीनीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:-
जमीन विक्री करणान्या व्यक्तीचे नाव - सागर उत्तम काकडे
जमीन उपलब्ध असलेल्या गावाचे नाव- मौजे सावळेश्वर ता. मोहोळ
विक्री करण्यात येणाऱ्या जमीनीचा गट क्रमांक- 292/2/ब/2
एकूण जमीन - 0.81 हे. आर
उपरोक्त शेतजमीनीवर कोणाचे खरेदीखत, साठेखत, लीज, कर्ज, दान, बक्षीस, पोटगी, वारसा अगर अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क व अधिकार असल्यास संबंधितांनी सदरचे नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसांच्या आत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, 3 रा मजला दुरध्वनी क्रमांक 0217-2734950 येथे योग्य त्या कागदपत्रांनिशी लेखी हरकत घ्यावी, अन्यथा वरील प्रमाणे मुदतीत कोणाची हरकत, तक्रार न आल्यास खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल व त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारीचा फेरविचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
ही जाहीर नोटीस दिली तारीख -28 मार्च 2025
अशी माहिती सदस्य सचिव, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हास्तरीय समिती तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर सुलोचना सोनवणे यांनी दिली आहे.
.jpeg)