Type Here to Get Search Results !

क्लिनिकमध्ये ड्युटीसाठी गेलेली नर्स बेपत्ता

सोलापूर : कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेली २५ वर्षीय विवाहिता घरी परतली नाही. तिच्या पतीने कार्यस्थळी चौकशी केली असता, ती ड्युटी संपल्यावर घरी गेल्याचे सांगण्यात आले. २५ वर्षीय आरती सर्जेराव शिंदे असं तिचं नांव असून ती बेपत्ता झाल्याची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झालीय.

येथील जुळे सोलापूर कल्याण नगरातील रहिवासी सौ. आरती एका खासगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करित होती. ती ९ एप्रिल रोजी सायंकाळी ०६ वा. क्लिनिकमध्ये ड्यूटीस गेली. ती ड्युटी संपल्यावर रात्री घरी न परतल्याने पती सर्जेराव शिंदे यांनी क्लिनिकमध्ये जाऊन चौकशी केली असता, तेथे ती कामाची वेळ संपल्याने ती निघून गेल्याचे सांगण्यात आले.

तिचा आजुबाजूच्या परिसरात नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. म्हणून तिच्या पतीच्या अर्जानुसार  विजापूर नाका पोलीस ठाणे येथे बेपत्ता दाखल आहे. 

नांव : आरती सर्जेराव शिंदे,राह. कल्याण नगर भाग-०२, जुळे सोलापूर, उंची-०५ फुट रंग-सावळा, बांधा-मध्यम, भाषा-मराठी, हिंदी, नेसणीस कपडे- अंगात पांढऱ्या रंगाचे चुडीदार ड्रेस असं बेपत्ता महिलेचं वर्णन आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळाल्यास पोलीस हवालदार एस. बी. फुलारी यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलंय.