सोलापूर : येथील अक्कलकोट रोड, कोंडा नगर परिसरातील न्यू सागर मित्र मंडळाच्या बालमित्रांनी श्रीराम नवमीनिमित्त आगळा-वेगळा उपक्रम राबवून परिसरातील नागरिकांची मने जिंकली. या बाल-चमूंनी अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी कार्यक्रम केल्याबद्दल अनेकांनी या लहान मुलांचं कौतुक केले.
श्रीराम नवमीनिमित्त सोलापूरातील राममंदिर व अन्य धार्मिक मंदिरात प्रभू श्रीरामाचं स्मरण करीत विविध उपक्रम राबविले. काही उत्साही मित्र मंडळाकडून मंडप टाकून पूजा विधी तर काही मंडळाकडून डी. जे. सारखे ध्वनी यंत्रणा लाऊन रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
...आपण हेही पाहू शकता !
एकतेच्या बळावर देशाची सुबत्ता आणि समृद्धी अवलंबून असते : सहा. पोलिस आयुक्त प्रताप पोमण
https://www.shivrajyapatra.co.in/2025/04/blog-post_25.html
न्यू सागर मित्र मंडळाच्या बालमित्रांनी शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराअंतर्गत मिळालेले तांदुळ जमा केले. त्याचबरोबर परिसरातून देणगी गोळा करून या भागातील नागरिकांना चक्क महाप्रसादाचं वाटप केले. लहान मुलांनीच मोठ्यांच्या सल्ल्यानं महाप्रसादासाठी स्वतःच खिचडी भात तयार केला होता.
यासाठी बालगोपालातील रोहन, कार्तिक, अमोल, प्रणव, प्रेरणा, अर्निका, काव्या, नेहल, वर्षिता, सन्निधी यांनी महाप्रसाद आणि पूजा करून परिसरातील नागरिकांना एक वेगळा संदेश दिला.