महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांच्या हाती देण्यासह विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जेल भरो

shivrajya patra

सोलापूर 

गया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या हाती देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रिय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिच्छडा वर्ग मोर्चा आदी सर्व संघटनांच्या माध्यमातून बुधवारी, 09 एप्रिल रोजी सायंकाळी जेल भरो आंदोलन करण्यात आले.

भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा आदी संघटनांच्या वतीने महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या हाती देण्यासह अन्य मागण्यांसाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलन सुरु आहे. त्याच्या चौथ्या टप्प्यात बुधवारी, जेल भरो आंदोलन करण्यात आले.

बहुजन महापुरुषांचा सतत षड्:यंत्र करून अपमान करणाऱ्या RSS आणि BJP ला विरोध, केंद्र सरकारच्या वतीने ओबीसी ची जातीनिहाय जनगणना करण्याला समर्थन, लोकशाहीला धोका असणाऱ्या EVM चा वापर करून लोकशाहीतला मताचा अधिकार शून्य करणाऱ्या एलेक्शन कमिशन च्या कार्यक्रमाला विरोध आणि वक्फ कायद्यात सुधारणा करून मुसलमानाच्या धार्मिक अधिकारावर गदा आणण्याच्या विरोधात हे जेलभरो आंदोलन करण्यात आले.

प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत रॅली काढून शेवटी रॅली चे रूपांतर जेलभरो आंदोलनात करण्यात आले.

यावेळी भारत मुक्ती मोर्चा जिल्हा संयोजक ॲड. योगेश शिदगणे, मातंग समाज कृती समितीचे युवराज पवार, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे फारुक शेख, बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा प्रभारी प्रशांत गायकवाड, भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष भारत दळवी, लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजकमल हटकर, फिरोझ शेख, ॲड. तुकाराम राऊत, महेश निकंबे, चंद्रकांत फडतरे, महादेव रणधरे, महेंद्र सोनवणे, भारत दळवी, शोभा गायकवाड, धनश्री शिदगणे, मनीषा सातपुते इत्यादी महिला  पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top