बंजारा समाजाच्यावतीने मंत्री संजय राठोड यांचा शनिवारी नागरी सत्कार

shivrajya patra

सोलापूर :  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बसवेश्वर नगर देगाव येथे शनिवारी, १२ एप्रिल रोजी सांय ८.०० वाजता नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड शनिवारी, १२ एप्रिल रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून बसवेश्वर तांडा येथील समस्त बंजारा समाजाच्या वतीने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. 

या सत्कार सोहळ्यासाठी बंजारा समाजातील सर्व समाज बांधवानी तसेच शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण यांनी केलं आहे.

To Top