सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात, सन २०२४ व सन २०२५ मध्ये दाखल असलेल्या, घरफोडी-चोरीचे घटनेमध्ये, फिर्यादींचे चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, त्यांना परत करणेचा कार्यक्रम शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी, पोलीस आयुक्तालय येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रमाणे, पोलीस आयुक्तालय घटकातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील मालाविषयक उघडकीस आलेल्या १५ गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल त्यामध्ये, ११०० ग्रॅम सोन्याचे दागिने व १००० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण ०१ कोटी रूपये किंमतीचे दागिने, संबंधीत फिर्यादींना नियमानुसार परत करण्यात आले. 
त्याचबरोबर, सायबर पोलीस ठाणे कडील विविध घटनेत सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या ०८ व्यक्तींचे सुमारे ६५ लाख रूपये हे त्यांना परत करणेत आले. अशा प्रकारे, एकूण २३ व्यक्तींचं सुमारे ०१ कोटी ६५ लाख रूपये किंमतीचा ऐवज, पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी परत केला.
मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे तसेच, संबंधीत विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल कारकून उपस्थित होते.
