दरोडा टाकणारी o५ जणांची टोळी अवघ्या ८ तासात गजाआड

shivrajya patra

 

गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी; 100 % मुद्देमाल जप्त

सोलापूर : सोमवारी पहाटे पत्रकार भवन चौकात टेंपो अडवून ५ जणांच्या टोळीने चालक नवनाथ विश्वनाथ बारबोले यांच्यासह दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील दहा हजार रुपयांची रोकड चांदीचे ब्रासलेट जबरीने चोरून नेले. त्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावण्यात सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला अवघ्या आठ तासात यश आलंय. याप्रकरणी पाच जणांना गजाआड करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर उभे केला असता, न्यायालयाने 18 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.

पत्रकार भवन चौकात अनोळखी पाच जणांनी एम एच 42 बी 9065 क्रमांकाचा टेम्पो अडवून, चालकासह दोघांना मारहाण करून प्रारंभी त्यांच्यावर दहशत बसवली. त्यानंतर त्यांच्याकडील रोकड, 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रासलेट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सदर बझार पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सागर सरतापे, राजेश चव्हाण, सोमनाथ सुरवसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशान भुमी येथे थांबल्याचे समजले.

गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्मशानभूमी थांबलेल्या संशयितांस पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जात असल्याचे पाहून थोड्याच अंतरावर पाठलाग करून त्याच पकडण्यात आले.

मनोज सिताराम चलवादी (घर नं-१३८, श्यामा नगर, मोदी पोलीस लाईनच्या बाजुला, सोलापूर), आकाश सदाशिव गड्डम (जय शंकर तालीम जवळ, मोदी, सोलापूर), महेश राम भंडारे (घर नं-५९३ मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी सोलापूर), विनायक सिद्राम म्हेत्रे (वय- १९ वर्ष, घर नं-१०८, मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी, सोलापूर आणि जुएल जोसेफ दिनकर (वय-२४ वर्ष, रा-घर क्र.६७,८५ गाळा, मोदी, सोलापूर) अशी या पाच संशयित दरोडेखोरांची नांव असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने टेम्पोतील चालकासह इतरांना मारहाण करून त्यांच्याकडील वरील ऐवज जबरदस्तीने नेला होता, गुन्ह्यातील या आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिलेले असून त्यांच्या ताब्यातून शंभर टक्के माल अवघ्या 08 तासात हस्तगत केला. 

या गुन्ह्यात वरील आरोपींना सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी सर्व आरोपींना अटक केलीय. या टोळीच्या ताब्यातून शंभर टक्के मुद्देमाल करण्यात आलाय. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सपोआ (विभाग-२) यशवंत गवारी, सदर बझार पोलीस ठाणे कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहा. फौजदार औदुंबर आटोळे, पोलीस हवालदार सागर सरतापे, राजेश चव्हाण, संतोष पापडे, पोलीस शिपाई सागर गुंड, हणुमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे, उमेश चव्हाण, राम भिंगारे, परशुराम म्हेत्रे यांनी पार पाडली.

To Top