सोलापूर : संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मीनल दास यांची निवड संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
उद्धव ठाकरे गटाच्या सेनेचे शहर प्रमुख म्हणून मीनल दास कार्यरत आहेत. त्यांनी विविध महिलांच्या योजना चांगल्या प्रकारे राबविले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष मीनल दास यांनी आगामी काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलावरील अत्याचारांच्या प्रश्नावर व विविध शासनाच्या योजनेचा लाभ महिलांना मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष मोनाली धुमाळ यांनी नूतन जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण भाऊ माने शहराध्यक्ष शिरीष जगदाळे गोवर्धन गुंड दिलीप निंबाळकर वैभव धुमाळ, प्राजक्ता कुलकर्णी, शोभा आनंदी आणि धुमाळ शोभा देसाई, जयश्री जाधव, संजीवनी सलबत्ते, राजश्री शिंदे, अन्नपूर्णा पाटील, प्राजक्ता कुलकर्णी, माधुरी उडाणशिव, सुजाता काशिकर, भारती गुन्नाल आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.