मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफ्फुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी सर्व मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी पक्ष सोलापूरचे संपर्कमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आलीय.
पक्षाची पुढील रूपरेखा आगामी काळात पक्षीय अजेंडा आणि वाटचाल या विषयावर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत पक्ष संघटनेला ताकत देण्याकरीता राज्यातील विविध जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून मंत्रीमंडळात मंत्री यांना देण्यात आले. यामध्ये सोलापूर जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोपविण्यात आलीय. जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी याप्रसंगी अजित पवार भेटून अभिनंदन केलंय.
अजित पवार सोलापूरचे संपर्कमंत्री झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आनंद व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री पवार सोलापूर संपर्कमंत्री झाल्याने येत्या काळात सोलापूरचे प्रश्न तसेच पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागून सोलापूर शहर जिल्ह्यात विकास होऊन राष्ट्रवादीची ताकत वाढणार आहे, असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी म्हटलंय.