स्वराज्य सप्ताह अंतर्गत 'सबका राजा छत्रपती शिवाजी राजा' या विषयावर व्याख्यान
सोलापूर : छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये प्रत्येकाला सर्व धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य आणि सुरक्षा होती. अनेक धर्म अन् प्रत्येक समाजातील लोक स्वराज्य लढ्यात सामील झाले होते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रचंड आदर, निष्ठा आणि विश्वास सर्व धर्म-समाजाच्या लोकांमध्ये अनंतापर्यंत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजा वत्सल्य आणि लोककल्याणकारी राजे होते, असं प्रतिपादन प्रा. जैनुद्दीन पटेल यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा होत असलेल्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत 'सबका राजा, छत्रपती शिवाजी राजा' या विषयावर प्रा. जैनुदीन पटेल यांचं शिवव्याख्यान अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शहराध्यक्ष अमीर शेख यांनी आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अल्पसंख्यांक विभागाच्या राज्याचे अध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार इद्रिस नाईकवाडी होते.
'सबका राजा छत्रपती शिवाजी राजा' या विषयाला घेऊन विचारपुष्प माला गुंफताना प्रा. जैनुदीन पटेल शिवचरित्रातील अनेक प्रसंग अन् घटनांचे दाखले देत, अठरा पगड जाती, बारा बलुतेदार सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य लोक कल्याणकारी स्वराज्यासाठी समर्पित केले, असं सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याच्या विचारांचा वारसा प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जपावा. त्यांचा आदर्श घेऊन जीवनक्रम करावे, असं आवाहन आमदार ईद्रीस नाईकवाडी यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते अॅड.सलीम नदाफ, प्रा. श्रीनिवास कोंडी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, फारूक मटके माजी नगरसेवक गणेश पुजारी, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष नजीर ईनामदार, कार्याध्यक्ष संजीव मोरे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सहकार सेल विभाग भास्कर आडकी, महिला आघाडी शहर सचिव प्राजक्ता बागल, अर्चना दुलंगे, शहर–सचिव दत्तात्रय बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, श्यामराव गांगर्डे, समदानी मत्तेखाने, मोईज मुल्ला, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, जहीर शेख अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अशपाक कुरेशी, रझाक शेख, गफार तांबोळी, रिहान शेख, फैजन शेख, शाहीद शेख, सादिक तोतलबाग, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, जमील बागवान, नय्युम सालार, कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग सांगली आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.