जिल्हा पुरुष खो-खो संघांच्या सराव शिबीरास प्रारंभ

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा पुरुष खो-खो संघांच्या सराव शिबीराम हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर प्रारंभ झाला.उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने हे शिबिर आयोजित केले आहे. ह. दे. प्रशालेचे पर्यवेक्षक हनमंतू मोतीबने यांच्या हस्ते सराव शिबीराचं उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सचिव अजित शिंदे, आशिष औदूरती, वैभव लिगाडे व नाना पाटील आदी उपस्थित होते.  

हे सराव शिबीर सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात सुनील चव्हाण व आशिष औदूरती हे घेत आहेत.

To Top