पत्रकारांवर होणारे हल्ले आणि अन्यायासंबंधी आवाज उठविण्याची गरज : प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे
सोलापूर : डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठविण्याची गरज असून डिजिटल मीडिया परिषदेत काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी सुध्दा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मिडिया परिषद हवे, ते प्रयत्न करणार असल्याचा मानस मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केला.
मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवडीसंबंधी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा डिजिटल मिडिया परिषदेचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या आदेशानुसार आणि डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी, ०९ मार्च रोजी ऐश्वर्या हॉटेल येथे बैठक घेऊन सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा पदाधिकारी तसेच कार्यकारिणीची निवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित नूतन पदाधिकारी आणि सदस्यांना संघटनेचे महत्त्व पटवून देताना प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे बोलत होते.
या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी 'आज तक' न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी रवि ढोबळे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्ती पत्र डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोलापूर डिजिटल मिडिया परिषदेत अन्य कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपसंघटकपदी लक्ष्मीकांत शिंदे (लोकदर्शन न्यूज चॅनल), प्रसाद दिवाणजी-जिल्हा उपाध्यक्ष (दै.तरुण-भारत संवाद), दीपक शिराळकर-जिल्हा उपाध्यक्ष (दैनिक पुढारी), विनोद ननवरे-जिल्हा उपाध्यक्ष (माझा न्यूज), अप्पा बनसोडे-शहर कार्याध्यक्ष (एबीएन न्यूज), शिलरत्न इंगळे-शहर कार्याध्यक्ष (दैनिक सकाळ), रत्नदीप सोनवणे-शहर सचिव (एमएच दर्पण न्यूज), वैभव गंगणे-शहर सहसचिव (के. सिटी न्यूज), यासीन शेख-शहर खजिनदार (आझादी बचाव), यश गुरव-शहर खजिनदार (दैनिक तरुण भारत, सोलापूर), अमर हुमनाबादे-शहर सहखजिनदार (जयहिंद 24), प्रमोद तुपसमुद्रे-शहर सहखजिनदार (जनताराज न्यूज), रोहन श्रीराम-(द सोलापूर टाईम्स), विक्रांत कालेकर- (इन न्यूज), शिवानंद येरटे-शहर सहसचिव (सम्यक न्यूज) आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.