राजकारणी चालते
रोजची रंग पंचमी
भाग घेई हिरीशिरी
कुणीचं नसते कमी
शब्दांची रंग पंचमी
बोलाया खुमखुमी
कोण बोलेल काय
कसली नाही हमी
होळीचे निमीत्ताने
संधी मिळते नामी
भडास काढे कुणी
वेळ असते हरामी
डोके मागे दुजांचे
प्रवक्ता असतो डमी
आजच्या दिवसास
चाले सारी बेशर्मी
आतले येते बाहेर
सुशांत दबली उर्मी
मन निर्मळ कराया
थंड करायची गर्मी
स्पष्ट होती स्वभाव
कोण कसे असामी
भले मारु द्या बढाई
सज्जन रे असा मी
धुली वंदन ...
होळी नंतर येणारा
सण हा धुली वंदन
ऋण जाणा मातीचे
करा मातीला वंदन
होई वसंत आगमन
हो कोकीळ कूजन
निमीत्ताने सणांच्या
भेटत राही स्वजन
भाळी लावता माती
फिक्के पडेलं चंदन
एक दुजांस करावे
रे निमित्ते अभिनंदन
वैर दुश्मनी जळाली
होता होली ज्वलन
जे जे अभद्र सगळे
झाले गेले स्खलन
परत एकत्र यायचे
पुरे करी रणकंदन
शिवी गाळ कशाला
हवे शब्दांला बंधन
राड उडवा एकदाचं
निर्मल करायचे मन
सोडा कपडे मलीन
निरामय व्हावे तन
बेरंग ...
रंगपंचमी धुलीवंदन
उधळते विविध रंग
खेळता दुःख विसरे
होऊ उत्सवात दंग
सांकेतिक रंगपंचमी
वापरावा कोरडा रंग
पर्यावरणाचे संरक्षण
बांधला चांगला चंग
रंगाला ना गाल बोट
कायदे ना व्हावे भंग
विसरा अभद्र घडले
दोस्ती रहावी अभंग
भेदभावाला न थारा
खेळतअसताना रंग
रंगलेले चेहरे समान
नको मनामध्ये व्यंग
उत्सवाचा न उन्माद
नको चढायला झिंग
अंगचटी येतो कुणी
गैर प्रकार ना धटींग
कुणीकरी नशापाणी
कुणा आवडते भांग
होळीचा वर बहाणा
नको मलीन अंतरंग
मुळ रंग
बुरा ना मानो पंचमी
पुढारी आले रंगात
निवडणूकीचा वारा
घुसला त्यांचे अंगात
हिरवा निळा भगवा
रंग पिवळा हातात
अपेक्षा एकच मनात
परिवर्तीत हो मतात
चेहरा माझा रंगवला
मिसळे त्यांचे पक्षात
माझा रंग रे कोणता
राहिले नाही लक्षात
प्रत्येक पुढारी म्हणे
तू आमच्या भात्यात
सगळे वाटले माझेचं
फरक नाही नात्यात
आपलाचं कार्यकर्ता
सगळे मला मानतात
माणूस भले कुणीही
रंग कोणता पाहतात
रंग सगळा उतरला
चेहराधुतला जोरात
मी आलो मुळ रंगात
थांबली माझी वरात
निवडणूकीच्या पूर्वी
सन्मान जणूं जमात
सर्व सामान्य माणूस
माझी फालतू जमात
- हेमंत मुसरीफ, पुणे-9730306996.
www.kavyakusum.com