खासदार आझाद यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी, भारत एकता मिशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

shivrajya patra

भंडारा : भीम आर्मी चीफ खासदार चंद्रशेखर आजाद व भाई विनयरतन सिंह यांच्या ताफ्यावर मथुरा आणि ओडिसात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने नोंदविण्यात आला.खासदार आझाद यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी, भारत एकता मिशनचे जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी, १० मार्च रोजी निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी मागास वर्ग आणि आदिवासींवर वारंवार होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आज भीम आर्मी, भारत एकता मिशन जिल्हा, भंडारा च्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

या निवेदनामध्ये खासदार चंद्रशेखर आझाद यांना Z+ सुरक्षा व भाई विनरतन सिंग यांना पुख्ता सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष भंडारा प्रभाकर मेश्राम, जिल्हा संपर्कप्रमुख अश्विन गोस्वामी, भंडारा जिल्हा प्रभारी विक्रांत भालाधरे, सोशल मीडिया प्रभारी अमोल भिवगडे, भंडारा तालुका अध्यक्ष महेंद्र बनसोड, भीम आर्मी भंडारा शहराध्यक्ष मृणाल रंगारी, तसेच सदस्य गण सनी खंडारे, मोहम्मद शेख, रितिक वासनिक, शुभम लोणारे, सिद्धांत रंगारी, तथागत फुले, तिलकराम रामटेके, दीपक बोरकर, प्रशांत रामटेके, मोतीलाल रामटेके, चेतन खांडेकर यांच्यासह भंडारा भीम आर्मी, भारत एकता मिशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

To Top