उत्तर सोलापूर : होनसळ येथील डीएम प्री प्रायमरी व दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका व पंचायत समिती सभापती रजनीताई भडकुंबे ह्या होत्या.
संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पोलीस कॉन्स्टेबल अर्चना मस्के उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याकडून राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी अर्चना मस्के यांचा संस्था व शाळेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुरक्षित महिला तिचे हक्क व संरक्षण व एक आदर्श मातायाविषयी माहिती दिली. यावेळी माता पालक पूजन व हळदीकुंकू कार्यक्रम ही संपन्न झाला. प्रशालेतील विद्यार्थिनींनी विविध राज्यातील वेशभूषा व त्यांची भाषा सादर केली. महिलांसाठी रांगोळी पाककला व वेशभूषा स्पर्धा संपन्न झाल्या.
प्रास्ताविक जरीना सय्यद सूत्रसंचालन सचिन नाईकनवरे, सुप्रिया पवार, शिल्पा उबाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमप्रसंगी होनसळ, राळेरास, हगलूर गावातील माता-पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.