सोलापूर : रमजान ईद-२०२५ चे अनुषंगाने सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता प्रस्थापित व्हावी, याकरीता पोलीस आयुक्तालयाकडील पोलीस उप आयुक्त, सहा. पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक या दर्जाचे ९५ अधिकारी तसेच ७०० पोलीस अधिकारी, ४०० होमगार्ड आणि एसआरपीएफ ची १ कंपनी असा बंदोबस्त निश्चित करण्यात आलाय.
रविवारी, ३० मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यास दुसऱ्या दिवशी, ३१ मार्च रोजी रमजान ईद साजरी होईल. ३१ मार्च रोजी चंद्र दर्शन झाल्यास, ०१ एप्रिल २०२५ रोजी सोलापूर शहरात रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.
रमजान ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर शहरात एकुण ३६ ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, म्हणून वाहतुक शाखेकडील पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
नमाज पठणाच्या मुख्य ०५ ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच सोलापूर शहरातील प्रमुख १२ मशिदींच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यात पोलीस उप आयुक्त ०३, सहा. पोलीस आयुक्त ०५, पोलीस निरीक्षक २२, सपोनि/पोसई ६५, पोलीस अंमलदार ७००, होमगार्ड ४०० आणि SRPF ०१ कंपनी असणार आहे.
