जिल्हाधिकारी कार्यालय उर्दू घर सांस्कृतिक समितीतर्फे मोहम्मद अयाज यांना सन्मान पत्र

shivrajya patra

सोलापूर : अल्पसंख्याक विकास विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर उर्दू घर सांस्कृतिक समिती यांच्यावतीने सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हे सन्मान पत्र सोलापूर चे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह व उर्दू घर चे उपाध्यक्ष प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी मंचावर  पद्मश्री डॉ. सोमा घोष उपस्थित होत्या.

उर्दू दिनानिमित्त  मंगळवारी, २५ फेब्रुवारीला शिवछत्रपती रंगभवन येथे काव्य संमेलन व रंगे गझल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रंगे गझलमध्ये प्रसिध्द पद्मश्री पारितोषिक विजेत्या सोमा घोष व महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज हे आपल्या गझलांने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  

भारतीय हिंदी सिने गीत तसेच उर्दू गझल च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशात आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार केला. सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दुबई, सिंगापूर, ईस्ट आफ्रिका, श्रीलंका कोलंबो, अबुधाबी, बहेरिन आदी देशांमध्ये आपली कला सादर केली. या माध्यमातून सोलापूर चे नांव सांगितीक क्षेत्रात लौकिक केल्याबद्दल मोहम्मद अयाज यांना हा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उर्दू घर सांस्कृतिक समितीचे सदस्यांसह शेकडो रसिक वर्ग उपस्थित होते.

To Top