सोलापूर : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या बलिदान दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने बहादूरगड येथील शंभूराजांच्या महापराक्रमी बलिदानाचा इतिहास असलेल्या शौर्यस्तंभास अभिवादन करून मानवंदना देण्यात आले.
कोकणातील संगमेश्वरी छत्रपती संभाजी राजांना पकडले होते, तेव्हा औरंगजेबाची छावणी ही अकलूजला होती, ती तात्काळ बहादूरगडावर हलवली गेली, यावरून हेच कळत की दक्षिणेमधील हे खरंच सुरक्षित ठिकाण होते.
छत्रपती संभाजी महाराजांना याच किल्ल्याच्या दिवाण-ए-आम मध्ये हजर केलं होते आणि त्यांच्यासोबत स्वराज्याचे छंदोगामात्य कवी कलश सुद्धा होते. महाराजांवरील तब्बल २६ दिवसांचा अमानुष अत्याचार इथेच करण्यात आला होता. कवी कलशांना सुचलेल, 'राजन तुम हो सांजे खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा प्रताप मही तखत तेजत औरंग' हे प्रसिद्ध काव्य औरंगजेबाच्या अन्वणीत अत्याचाराच्या वेळेस देखील इथेच लिहिलं गेलं होते, असं सांगण्यात येतं.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा संपर्कप्रमुख शत्रुघन माने, कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर आदी सोलापुरातून बहादूरगडाकडे जाऊन छत्रपती संभाजी राजांना अभिवादन केले.