सोलापूर : येथील स्वागत नगर परिसर नागेंद्रनगरातील सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालयात शनिवारी, गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम गुढीची विधीवत पूजा शाळेच्या सहशिक्षिका सौ. मिरकले, कु. जाधव, सौ. तरन्नुम यांच्या हस्ते संपन्न झाली. ज्यापद्धतीने गुढी आकाशाला गवसणी घालून संसाराचे रक्षण करते, हा सिद्धांत बाळगून बालभारतीने साकारलेली ज्ञानगुढी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विकास करण्याचे धोरण आखते. 
तंत्रज्ञान जगाकडे पाऊल टाकणाऱ्या बालभारती विद्यालयाने स्वानुभव, उपक्रम ज्ञानार्जन, हसतखेळत शिक्षण, आदर्श विद्यार्थी घडवण्याचा ध्यास मनी बाळगून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ज्ञानगुढी उभारण्याचे पवित्र काम मुख्याध्यापक हाजी रिजवान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपक्रमशील सहशिक्षिका सौ. तरन्नुम यांच्या कल्पकतेवरून पालकांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी केली. 
यावेळी २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेशित होणाऱ्या बालचमूंचे स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ज्ञानगुढीचे महत्व शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून रेखांकित केले. यावेळी संस्थेचे सचिव शब्बीर शेख, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अख्तरबानो शेख व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

