लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनी बुधवारी मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान शिबीर

shivrajya patra

सोलापूर : लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी, ०२ एप्रिल रोजी मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलंय. अक्कलकोट रस्त्यावरील एस.व्ही.सी.एस. प्रशालेच्या भव्य प्रांगणात आयोजित मोफत महाआरोग्य शिबीरात रक्तदान आणि २०० मोतीबिंदू शस्त्रक्रियांचं उद्धिष्ट ठेवण्यात आलं आहे. कामगारांचं शहर असा सर्वदूर परिचय असलेल्या सोलापुरातील नागरिकांनी या मोफत सर्वरोग महाशिबिरात सहभागी व्हावं, असं आवाहन मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान,गेली 26 वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवून स्व. ब्रह्मानंद मोरे यांना सामाजिक कार्याच्या माध्यमातून आदरांजली अर्पित करण्यात आले आहे. आजपर्यंत तालुका पातळीपर्यंत सीमित असलेल्या सामाजिक कार्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी यंदाच्या वर्षी सोलापुरात मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर भाजपा युवा नेते तथा मोरे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी प्रारंभी म्हटले.

बुधवारी.०२ एप्रिल रोजी सकाळी ०९ वा. श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी (काशी महापीठ) यांच्या दिव्य सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार हरिष पिंपळे (मुर्तिजापूर), आमदार सुहास बाबर (खानापूर) प्रमुख अतिथी व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सर्व गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी महाशिबीर सकाळी ०९ ते दुपारी ०४ वा. पर्यंत चालणार आहे, असं बाळासाहेब मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बुधवारी, मोरे प्रतिष्ठानचे समाज कार्य सोलापूरकरांच्या सेवेत सुरु होणार आहे. या शिबीरात ५०० बाटल्या रक्तदान व २०० मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तातील विविध तपासण्या, शुगर, बीपी-थुंकी-लघवी-ईसीजी मशीन हृदय तपासणी व अन्य आजारांच्या तपासण्या या शिबीरात होणार आहेत. 

शस्त्रक्रियेस पात्र रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप व आवश्यक औषध-गोळ्या मोफत दिले जातील. आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले जातील, मात्र मोबाईल व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. सोलापुरातील सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर महानगरपालिका आणि अश्विनी सह. रुग्णालय, कुंभारीसह खासगी नामवंत हॉस्पिटलमधील २५ तज्ज्ञ डॉक्टर्स-कर्मचारी या शिबीरात उपस्थित राहून रुग्णसेवा करणार असल्याचं बाळासाहेब मोरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेस मोरे प्रतिष्ठानचे  प्रमोद मोरे, बाळासाहेब मोरे, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, बृहन्मठ होटगी शिक्षण संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी आणि मोरे प्रतिष्ठानचे सचिव संजय टोंपे उपस्थित होते.

............

मोरे प्रतिष्ठानचं आजवरचं सामाजिक कार्य

सांगली पूरग्रस्तांना कपड्यांचे वाटप, सन २००४ च्या दुष्काळामध्ये जनावरांसाठी चारा छावण्याचे आयोजन, शैक्षणिक साहित्यांचे वाटप, 'पाणी अडवा, पाणी जिरवा' अंतर्गत अक्कलकोट तालुक्यामध्ये विविध बंधाऱ्याचे कामे पूर्ण, कुरुनूर येथे कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा, आरोग्य विषयक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व आरोग्य शिबीर, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, समाज प्रबोधनासाठी नामवंत किर्तनकारांचे किर्तन सोहळा-व्याख्यान, नामवंतांना पुरस्कार वितरण व अन्य सामाजिक कार्य आमच्या प्रतिष्ठानकडून मागील २६ वर्षांपासून करण्यात आले आहेत.

बाळासाहेब मोरे-अध्यक्ष

लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान.

 

To Top