भंडारा : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी बरेच काही दिल्याचे सरकार सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकरी लोकांना काहीच मिळणार नाही, असंच चित्र दिसते आहे, एकूण हा प्रकार "छत छिनकर, कंबल दान करने वाला बजेट !" असं असल्याचे मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अभय डी. रंगारी यांनी व्यक्त केलंय.
शेतमालावर निर्यात बंदी, किंमत ठरविण्याचा शेतकरी लोकांना हक्क नाही, विजेचा तुटवडा, खते महाग, वेळेवर खरेदी विक्री केंद्र सुरू नाही, हमीभाव नाही, अनुदान योजनाचे प्रमाण कमी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी एकही प्रयत्न होतांना दिसत नाही, असं किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अभय डी. रंगारी यांनी अर्थसंकल्पावर मत व्यक्त केलंय.
येथील शेतकरी लोकांना स्वत:ची गोदाम सुविधा उपलब्ध नाही, कंपनीचेच फायदे या अर्थसंकल्पात दिसतात, पशुधनाची चाऱ्याची सुविधा दिसत नाही, गावालगतचे जगलं पशूसाठी खुले पाहिजे, ते मात्र नाही, पण कंपनीला कुठेही परवाना, शेतीआधारीत उद्योगांना चालना पाहिजे, मात्र त्याउलट होताना दिसत आहे, हा अर्थसंकल्प म्हणजे 'छत छिनकर, कंबल दान' करने वाला अर्थसंकल्प आहे, असंही त्यांनी पाठविलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय.