कोयता गँगचा दरोडा... ! रोकड आणि कोयत्यासह अवघ्या तासाभरात ०५ आरोपी गजाआड

shivrajya patra

सोलापूर : पुण्यात कुप्रसिध्द कोयता गँगच्या धर्तीवर इथं नव्यानं उदयास येऊ पाहत असलेली कोयता गँग सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं गजाआड केलीय. गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न 5 आरोपींना अवघ्या तासाभरात अटक करून लुटून नेलेल्या 1,20,000 रुपयांपैकी रुपये 65,000 हजार रूपये आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता हस्तगत करण्यात आलाय.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरूवारी, 13 मार्च रोजी पहाटे 02.45 वा. च्या सुमारास कुमठा नाका येथील नाईस बेकरीसमोर व्यवसायाने केबल ऑपरेटर असलेले आनंद नरसप्पा कत्तुल (वय. 53 वर्षे, रा. प्लॉट नं.33 नवनाथ नगर, लक्ष्मी-नारायण थिएटर पाठीमागे, सोलापूर) व साक्षीदार रिक्षा नंबर MH 13/CT 2695 ने जात होते. 

त्यावेळी अनोळखी पाच ते सहा इसमांनी रिक्षा अडवून आनंद कत्तुल, रिक्षा चालक इस्माईल नबीलाल नदाफ आणि महेश पांडूरंग आवार यांना मारहाण केली. त्यावेळी एका इसमाने आनंद याच्या गळ्यास कोयता लाऊन, 'हलला तर खलास करीन' अशी धमकी देऊन खिशातील 1,20,000 रुपयांची रोकड जबदरस्तीने काढून घेतली. 

याप्रकरणी शुक्रवारी, 14 मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल झाल्यावर सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पोसई नितीन शिंदे व त्यांच्या पथकासह अनोळखी आरोपींचा शोध घेत असताना पो.कॉ. सागर गुंड, पो.कॉ. हणमंत पुजारी यांना मिळालेल्या माहितीनुसार शासकिय मैदानावर गेले, पथकास पाहून तेथे बसलेले पाच इसम पळून जाऊ लागले. त्यांचा पाठलाग करुन त्यांना मैदानात पकडले. 

या गुन्ह्याचे तपासात या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील रोख रक्कमेपैकी 65,000 रुपये व गुन्ह्यात वापरलेला कोयता तपासात जप्त करण्यात आलाय. या गुन्ह्यात अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाने हा गुन्हा 01 तासाच्या आत उघडकीस आणला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे, पो.हे.कॉ. शहाजहान मुलाणी, पो.हे.कॉ. राजेश चव्हाण, पोलीस हवालदार संतोष पापडे, पोलीस हवालदार सागर सरतापे, पो.हे.कॉ. एयाज बागलकोटे, पो.कॉ. सागर गुंड, पो.कॉ. सोमनाथ सुरवसे, पो.कॉ. हणमंत पुजारी, पो.कॉ. अनमोल लट्टे, पो.कॉ. उमेश चव्हाण, पो.कॉ. राम भिंगारे, पो.कॉ. परशुराम म्हेत्रे यांनी केली आहे.

..... चौकट .....

... ही आहे गजाआड झालेली कोयता गँग !

01) मुन्ना मुर्तुज सय्यद (वय-27 वर्षे रा-घर नंबर 64 विनायक नगर, राजराजेश्वरी शाळेशेजारी, एमआयडीसी, सोलापूर)

02) सागर विजय शिंदे (वय-20 वर्षे, रा- भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर)

03) विशाल रमेश बंदपट्टे (वय-20 वर्ष, रा- घर नंबर बी-5, भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर)

04) संतोष महेश हुंडेकरी (वय-30 वर्ष रा- घर नं.458 भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर)

05) जयेंद्र युवराज जाधव (वय 26 वर्षे, रा-न्यु पाच्छा पेठ अशोक चौक, ईगल टेलर दुकानसमोर सोलापूर)

To Top