सोलापूर : येथील वर्धमान नगर अपार्टमेंट सोसायटीचे खजिनदार, अपार्टमेंटमधील मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व, प्रसिद्ध व्यापारी शिवानंद मलकय्या स्वामी यांचं शुक्रवारी, २१ मार्च रोजी पहाटे निधन झाले. ते मृत्यूसमयी ५५ वर्षीय होते.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या मुळ गावी आळंद तालुक्यातील चलगेरी (जिल्हा-गुलबर्गा) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, ३ मुले, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रसिद्ध व्यापारी, उद्योगजक संगनबसव स्वामी यांचे भाऊ होत.