भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला यावं; सुजित अवघडे यांचं उपमुख्यमंत्री पवार यांना निमंत्रण

shivrajya patra

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सोलापूरला येण्याचं निमंत्रण दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन सुजित अवघडे यांनी हे निमंत्रण दिले.

विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काही दिवसांवर आली आहे. सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  जल्लोषात साजरी होत असते. या जयंतीच्या निमित्ताने शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना सोलापूरला येण्याचे निमंत्रण दिले.

तसेच या जयंतीत दोन बेस, दोन टॉप लावण्यासाठी परवानगी देण्यात यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील रमाई व बाबासाहेबांचे  पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने होण्याच्या आशयाचं निवेदन उपमुख्यमंत्र्यांना या भेटीत देण्यात आले.

फोटो ओळी :
हे निवेदन देतेवेळी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, विजयानंद काळे, RPI आठवले गटाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष राजा दावणे, सतीश कदम, आनंद इंगळे, राहुल कुचेकर यांची उपस्थिती होती.

To Top