...केलेले प्रयत्न सिध्दीस गेल्याचं समाधान वाटते : शिक्षकांची भावना; 21 वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

shivrajya patra

सोलापूर : शाळा स्थापनेपासून ते इयत्ता 10 वी ची पहिली बॅच म्हणून विद्यार्थ्यांना घडवत असताना ते बाहेर पडल्यावर विविध क्षेत्रात पाऊल ठेऊन यशस्वी वा यशवंत व्हावेत, त्यासाठी केलेले प्रयत्न आज सिध्दीस गेल्याचं समाधान वाटते, अशा शब्दात सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करीत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

निमित्त होतं ... उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने शिक्षण संकुलामध्ये सन 2003-04 दहावीच्या पहिल्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचं ... या स्नेहमेळाव्यानिमित्तानं आज विविध क्षेत्रात कार्यरत असलेले प्रशालेचे माजी विद्यार्थी २१ वर्षांनंतर एकत्र आले होते.

प्रारंभी प्रशालेतील सर्व माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रथमतः 10 वी चे वर्गशिक्षक उमेश जगताप सर यांनी हजेरी घेऊन विज्ञान विषयाचा तास घेऊन सुरुवात केली. मराठी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी विषयाचे तास घेऊन मुलांना 10 वी च्या जुन्या स्मृति जाग्या केल्या.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती संभाजीराव भडकुंबे साहेब व माजी सभापती रजनी भडकुंबे होत्या. संस्थेचे विश्वस्त अमित भडकुंबे, पाटलोजी जानराव उपस्थित होते.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतल्या आठवणी, संस्कार, शिस्त याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आज स्थितीला मिळवलेले यश यामध्ये शिक्षक, आरोग्य सेवक, अभियंता, महसूल सेवक, वकील, अंगणवाडी सेविका, बँक, प्रायव्हेट कंपनी, व्यवसाय, नोकरी, फायनान्स, आधुनिक शेती, गृहिणी यासारख्या विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत असल्याचे सांगून स्वतः शाळेत कसे घडलो, याविषयीचा प्रवास सांगत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

संस्थापक अध्यक्ष संभाजी भडकुंबे व रजनी भडकुंबे यांनीही माजी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचं कौतुक केले व पुढील वाटचालीस शभेच्छा दिल्या. यावेळी इयत्ता 10 वी च्या पहिल्या बॅच कडून शाळेसाठी भेट म्हणून CCTV कॅमेरे बसवून देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते.

यावेळी प्राचार्य राजेंद्र मोहोळकर, सर्वशिक्षक धर्मदेव शिंदे, उमेश जगताप, सचिन नाईकनवरे, अख्तर सय्यद, अशपाक अत्तार, प्रा. तात्यासाहेब तांबे, प्रा. जरीना सय्यद, प्रा. रोशनी कांबळे, शशिकांत गायकवाड, सुप्रिया पवार, विकी माने आदी उपस्थित होते. 

माजी विद्यार्थी कमलाकर जाधव, गणेश स्वामी, संजय भोसले, सज्जन पवार, अविनाश बनसोडे, प्रभाकर माने, सचिन मस्के, पृथ्वीराज पवार, हनुमंत साबळे, सचिन शेंडगे, तोशिब शेख, शिवशंकर वळसंगे, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब हेंद्रे, विलास कांबळे तथा माजी विद्यार्थिनी मनिषा डोंगरे, माधुरी सिरसट, अश्विनी गायकवाड, वासंती दौंडकर, विमल गायकवाड, महादेवी जाधव, कविता कांबळे, कांचन मस्के, शमीना सय्यद, पल्लवी नागोडे, अर्चना शेंडगे, कमल गायकवाड, पवित्रा डांगे इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महात्मा फुले हायस्कूल, मार्डी येथे कार्यरत प्रशालेचे माजी विद्यार्थी कमलाकर जाधव यांनी केले तर उमेश जगताप यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

To Top