सोलापूर : रमजान सणानिमित्त शहरात विजापूर वेस, बेगम पेठ परिसरात मीना बझार भरतो. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. हा रस्ता २२ ते ३१ मार्च वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले. वाहतूक मार्गात बदल केल्याचा आदेश गुरुवारी काढण्यात आलाय.
या परिसरात दुकाने व हॉटेल यांचा व्यवसाय असून सदर दुकानामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विजापूर वेस कडे येणारे बेगम पेठ पोलिस चौकी, बाराईमाम चौक, बाकळे प्रेस, लक्ष्मी मार्केट, पंच कट्टा, पेंटर चौक, रंगरेज बोळ आणि माणिक चौक हे रस्ते बंद केले आहेत.
वाहतुकीस बंद केलेल्या रस्त्यांना पर्यायी मार्ग म्हणून माणिक चौककडून समाचार चौक, भावसार पथ बाराईमाम चौक, किडवाई चौक, हवाई चप्पल मार्ट चौक, ट्रेझरी बँक कॉर्नर, पंच कट्टा लक्ष्मी मार्केट मार्गे, दत्त चौक या मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन करण्यात आलंय.