यावर्षी रंगपंचमी दिनांक १९ मार्च २०२५ रोजी आहे. तत्पूर्वी म्हणजेच, रविवारी, १६ मार्च २०२५ रोजी, सकाळी ९:०० वा. पर्यावरणपूरक पद्धतीने हा सण साजरा करण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सोलापूरचे ब्रँड अॅम्बेसेडर पद्मश्री अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं आहे.
ज्येष्ठ नागरिक संघटना संयुक्त शिखर (समन्वय) समितीच्या माध्यमातून सोलापुरातील तमाम ज्येष्ठ नागरिक संघटनांचे प्रतिनिधी, सोलापूर वन विभाग, सोलापूर विकास मंच, हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळ आपला सहभाग नोंदवणार आहे.
यावेळी मोनिका सिंह (अॅडिशनल जिल्हाधिकारी, सोलापूर), तैमूर मुलाणी (उपायुक्त, सोमपा), निलेश पाटील (तहसीलदार, उ. सोलापूर), विशाल चव्हाण (सहाय्यक वनसंरक्षक, सोलापूर वनविभाग), गजानन होनराव (अध्यक्ष, हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळ), योगीज गुर्जर (सोलापूर विकास मंच), महादेव माने (शासकीय संनियंत्रक समिती, सदस्य) इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने अक्कलकोट रस्त्यावरील हेरिटेज मणिधारी एम्पायर, सूत मिल कंपौड-उद्यानात आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमास पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असा आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आलंय.