वरवडे : सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत असलेले डाॅ. सोमनाथ बोराटे यांची महात्मा फुले युवा दल प्रदेश संघटक प्रमुखपदी निवड करण्यात आलीय. महात्मा फुले युवा दल संस्थापक प्रमुख ॲड. सतीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.
माढा तालुक्यातील मौजे वेणेगांव येथील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. सोमनाथ बोराटे यांचं विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.
संघटनेचे कार्य जनसामान्यांचा उन्नतीसाठी, शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं डॉ. सोमनाथ बोराटे यांनी निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना म्हटले. या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.
