सोलापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर विभागाच्या वायुवेग पथकामार्फत अटकाविण्यात आलेल्या 45 वाहनांच्या वाहनधारकांनी दि. 8 एप्रिल 2025 पूर्वी वसूली योग्य असलेली रक्कम प्रादेशिक परिवहन अधिकारी सुंदरम नगर, विजापूर रोड ,सोलापूर यांच्या कडे भरण्यात यावी, असं आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केलं आहे.

रक्कम भरण्यात आली नाही तर सोडवून न नेलेल्या वाहनांची ई-लिलावाद्वारे, 09 एप्रिल 2025 रोजी विकण्यात येतील. ई-लिलावाच्या नंतर थकबाकीदारास वाहन कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकारी राहणार नाही.
ही वाहने विक्री कायम होण्यास अधीन राहिल. अधिक माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील सूचना फलकावर लावण्यात आली आहे, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी कळविलं आहे.