सोलापूर : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील 22 शासकीय कार्यालयात च्या 32 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक अर्थात 05 तक्रारी आल्या असून या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयानी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा.
तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, कौशल्य विकास कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संगीता खंदारे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, तहसीलदार श्रीकांत पाटील, आरोग्य विभागाचे डॉ. विजय वरवटकर यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
.jpeg)
जिल्हा परिषद सोलापूर- 5 , पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण - 2, पोलीस आयुक्त सोलापूर शहर- 1, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख कार्यालय सोलापूर- 1, कामगार आयुक्त- 1, सार्वजनिक बांधकाम विभाग- 1, महसूल शाखा- 2, तहसिलदार बार्शी-1, तहसिलदार उत्तर सोलापूर- 1, महावितरण सोलापूर-3, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक, सोलापूर-1, भुसंपादन शाखा- 1, उपविभागीय अधिकारी पंढरपूर- 2, तहसिलदार माळशिरस- 1, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रं.2- 1, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, सोलापूर- 2, तहसिलदार पंढरपूर-1, प्रबंधक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर-1, जिल्हा उपनिबंधक सह संस्था सोलापूर-1, प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर विभाग, सोलापूर- 1, तहसिलदार महसूल- 1 आणि दुय्यम निबंधक सोलापूर-1 अशा एकुण 32 तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत, असं सांगण्यात आलंय.