हेमाडपंथी मंदिरात बसले
शिवशंभू माझे,
काशीवरूनी आले डमरूवाले
कैलासाचे राजे,
कुणी स्थापिले कधी बांधले
कुणा कसे ना ठावे,
भव्य शीळात शिल्प गोंधले
नयनी दिव्य हे पाहावे,
गोमुखातून ध्वनिलहरी
उमटती ओंकाराचा,
महाशिवरात्रीला गजर घुमे
हर हर महादेवाचा,
पंचक्रोशीतील भक्तगण जमती
कासेगांव नगरी,
कळस चमकतो अन् खुणावतो
उंच उंच शिखरी,
मानाची जाते कावड
दरवर्षी शिंगणापुरी,
बेल फुल घेऊन या
भक्तहो शिवशंभूच्या मंदिरी !
कवी
भगवान धर्माण्णा चौगुले
कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर
मोबाईल क्र. 7972602030
.jpg)