निलेश महामुनी यांच्या "मित्र प्रेम " पुस्तकाचे प्रकाशन
मित्र प्रेम या कथांमध्ये सोलापूरी लहेजा जपला आहे : गायकवाड
सोलापूर : आपल्या बालपणीच्या आठवणी, केलेल्या उनाडक्या, गल्लीतील घटना, उत्सव, घडलेले गंमती शब्दात जागवल्या जातात. मैत्री खातर केलेल्या चुका त्यातून होणारे दुष्परिणाम याचा योग्य संदेश देण्याचा प्रयत्न या सदरातून झाले आहे. वाहत चाललेल्या युवकांना योग्य संदेश देण्याचं काम ' मित्र प्रेम ' पुस्तकातून झाले आहे, असे मत लेखक आणि समिक्षक समीर गायकवाड यांनी व्यक्त केले.
नवोदित लेखक निलेश महामुनी यांच्या ' मित्र प्रेम ' या पुस्तकाचे प्रकाशन चौडेश्वरी मंगल भवन येथे माजी मंत्री विजयकुमार देशमुख, लेखक समीर गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, ॲड. राजन दिक्षित, महेश धाराशिवकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लेखक आणि समिक्षक समीर गायकवाड बोलत होते.
कथा साकारत असताना ती प्रमाणित भाषेतच असावी असा दंडक नाही, आपल्या लहेजा त केलेले लेखन हे अधिक भावते, निलेश महामुनी यांनी आपल्या मित्रांना केंद्रबिंदू मानून जे लेखन केले आहे ते वाचत असताना जी भाषा वापरली आहे, ती प्रत्येकास आपली वाटते, असंही समिक्षक समीर गायकवाड यांनी म्हटले.
लेखन केंव्हा आणि कोठे सुचते याला महत्त्व आहे. आपला वेळ सत्कारणी लावण्याचं काम नवोदित कवि निलेश महामुनी यांनी केलं आहे, असे मत माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
हा प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी निलेश धाराशिवकर, शशी थोरात, अभिराज शिंदे, प्रकाश शिंदे, सिध्दू परळकर, विशाल कांबळे, सचिन रेळेकर, दिनेश नळे, अमोल कदम, कपिल पवार हरिश सिध्दे, शिवू कलशेट्टी आदी मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.
