तलावात आढळलेल्या मृतासंबंधी ग्रामीण पोलिसांचं आवाहन

shivrajya patra

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा तलावातील भरावजवळ सुमारे ३५ ते ४० वर्षीय तरूण पाण्यावर तरंगत असल्याचं रविवारी सकाळी दिसून आलंय. त्यास पाण्यातून बाहेर काढून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू उपचारापूर्वी झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केलंय. या मृताची अध्यापक ओळख पटलेली नाही. यासंबंधी अधिक माहिती असणाऱ्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा ग्रामीण पोलिसांनी केलंय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी सकाळी तळे हिप्परगा तलावाच्या भरावानजिक टॉवर नं. २ जवळ एक इसम पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असतांना दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला कळविली. तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रशीद बाणेवाले यांनी घटनास्थळाला ग्रामस्थांच्या मदतीने त्यास तलावातील पाण्यातून बाहेर काढून यादी सोबत सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

सिव्हिल हॉस्पिटल तातडीच्या वैद्यकीय कक्षातील डॉ. श्रीकृष्ण बागल (सी.एम.ओ.) यांनी त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. या मृतासंबंधी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात १२/२०२५ क्रमांकानुसार बी.एन.एस. एस.१९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल आहे.

मृताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, रंग गोरा, उंची १७२ सें.मी. अंदाजे, बांधा - मजबूत, डोकीस काळे केस, चेहऱ्यावर दाढी-मिशी काळे पांढरे आणि मयताचे अंगावर नेसणेस कपडे-ग्रे रंगाची जीन पॅन्ट त्यावर G Fast The class od fashion असे लेबल असलेली, ग्रे रंगाचा फुल बाहीचा शर्ट त्यात पिवळा, ग्रे, काळा, पांढरा रंगाचे चौकडा शर्ट त्यावर URBAN SHIRTS happen BABA BELIEVE IN YOURSELF INDIA असे लेबल आणि काळ्या रंगाची LUX VENUS कंपनीची अंडरवेअर असं वर्णन आहे. 

या छायाचित्रातील इसमाची ओळख पटण्याच्या दृष्टीकोनातून त्याच्यासंबंधी कोणास माहिती मिळाल्यास त्यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे, गुरुनानक चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असं आवाहन तपासिक अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक रशिद बाणेवाले (मोबाईल नंबर-९५५२५२१४८२) अथवा सोलापूर तालुका पोलीस ठाणे (फोन नंबर ०२१७- २७३२०१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.


To Top