पुणे : माता रमाई आंबेडकर जयंतीदिनी माता रमाई आंबेडकर पुतळा, वाडिया कॉलेजसमोर पुणे येथे नियोजित-शाक्य शौर्य विजय स्तंभ सेवानिवृत्त पोलीस संघ, पुणे व यशसिद्धी माजी सैनिक (महार रजिमेंट) यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंतीनिमित्त शुक्रवारी, ७ फेब्रुवारी रोजी सलामी देऊन साजरी करण्यात आली. यावेळी बार्टी पुणे चे महासंचालक सुनील वारे यांनी बार्टी च्या विविध योजनांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विठ्ठल गायकवाड प्रमुख माता रमाई स्मारक यांनी माहिती व संघाला मदतीचे आश्वासन दिले. यावेळी बापू पोळके, (माजी कॅप्टन), अशोक दिलपाक, (शाक्य संघ, नियोजित-महाराष्ट्र संघटक), शिवपुत्र घटकांबळे (यशसिद्धी माजी सैनिक उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), सुभाष सर्वगोड, नवनाथ आडसुळ, अर्जुन कांबळे, अशोक चवरे, कलप्पा तेरदाळ, फुलचंद वाघमारे, पद्माकर सकपाळ, संतोष वानखेडे, राजू नाईकनवरे, रामचंद्र यादव, पोपट आल्हाट, बुद्धा चव्हाण, रमेश सोनवणे व इतर सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.