(प्रतिकात्मक छायाचित्र)
पुणे : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात धक्कादायक घटना घडलीय. महाराष्ट्राची मान खाली करणारी घटना असून स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालाय. हा प्रकार बुधवारी, २६ फेब्रूवारी रोजी पहाटे ०५.३० वा. घडल्याची नोंद स्वारगेट पोलीस ठाण्यात झालीय. या घटनेने महिला सुरक्षेची लक्तरं वेशीवर टांगल्याचं दिसतंय.
पीडित तरुणी 26 वर्षीय असून तिच्याशी दुष्कर्म केलेल्या आरोपीचं नांव दत्तात्रय रामदास गाडे असल्याचं पुढं आलंय. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची तपास पथकं रवाना झाल्याचं सांगण्यात आलंय.
ताजा कलम : संपूर्ण पुणे शहराला हादराहून सोडणाऱ्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेला जबाबदार धरून 23 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलंय. या दुष्कर्म घटनेने महिला प्रवाशांची सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती पुढं आलीय.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार गंभीर असं त्याची आठवड्याभरात चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या पोलिस आयुक्तांना दिले असल्याचे वृत प्रसार माध्यमात झळकत आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत स्वारगेट बस स्थानक परिसरात आंदोलन केलंय.
.jpeg)