कासेगांव/संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे येथील शेतकरी तुकाराम माने व त्यांचे बंधू पांडुरंग माने यांच्या दोन्ही मुलांनी पहिल्याच टप्प्यात प्रयत्न करून मुंबई पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केलंय. विजय पांडुरंग माने व समाधान तुकाराम माने हे पोलीस दलात भरती झालेले यशवंत आहेत. त्यांच पंचक्रोशीत अभिनंदन केलं जात आहे.
ही दोन्ही मुले पोलीस भरतीच्या पहिल्याच टप्प्यात यशस्वी झाली आहेत. एका गरीब शेतमजूर अन् शेतकऱ्यांची मुलं असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केला आहे.
त्यांच्या या विषयाबद्दल संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा च्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख शत्रुघन माने यांनी भीम प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार केला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम अप्पा वाघमारे, कवी रामप्रभू माने, नारायण गायकवाड, अमोल साबळे, राहुल वाघमारे, नागनाथ साबळे, सोमनाथ सोनकांबळे, तसेच सोलापूर शहर व जिल्हा संभाजी ब्रिगेडचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी माने घराण्यातील त्यांचे मोठे बंधू नामदेवराव माने हे सुद्धा सध्या पोलीस सेवेत आहेत. त्यामुळे एकाच घरातील तीन जणांना पोलीस होण्याचा बहुमान गावात बहुतेक पहिल्यांदाच प्राप्त झाला आहे. त्यांच्या यशाचे संपूर्ण गावकऱ्याकडून कौतुक होत आहे.