सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 व्या जयंती उत्सवनिमित्त केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या पदयात्रेचे मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान आणि मुस्लिम मावळ्यांनी १०० किलो फुलांची पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उप जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, प्रांताधिकारी सदाशिव पडदूणे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत माजी महापौर आरिफ शेख, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, कॅप्टन शफीक, मुबीन सय्यद, अल्ताफ लिंबूवाले, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, अविनाश गोडसे, मुस्लिम ब्रिगेडचे राजू हुंडेकरी, मौलाना इरफान, बशीर सय्यद, हारुण शेख, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्युम मोहळकर, रिजवान दंडोती, तन्वीर शेख, बाबा शेख, एजाज बागवान, मक्सूद शेख, वाहिद शेख, हारिस शेख, खाशिम बेलीफ, रुस्तुम शेख, इरफान शेख, खलील कादरी, रिजवान पैलवान आदी पदाधिकारीसह हजारो विद्यार्थी, नागरिक या 'जय शिवाजी, जय भारत पदयात्रेत सहभागी झाले होते.