दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन नागपुरात होणार

shivrajya patra

सोलापूर : "अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद", सोलापूर तर्फे आयोजित दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन १९, २० एप्रिल २०२५ रोजी नागपूर इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष डॉ. अजीज नदाफ, सचिव अय्यूब नल्लामंदू व संयोजक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी एका पत्रकाद्वारे जाहिर केलं आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड, स्मरणिका प्रकाशन व इतर कामे व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचंही निश्चित झालं आहे.

हे संमेलन अखिल भारतीय स्तरावर संपन्न व्हावे, यासाठी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद यांच्या मुख्य आयोजकांसह भारतीय मुस्लीम परिषद, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, छवी पब्लिकेशन्स, हिंदी साहित्य परिषद या सर्वांच्या सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. हे संमेलन व्यवस्थित पार पडावे, म्हणून नियोजन करण्यासाठी अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद सर्व साहित्यिकांशी संपर्क साधत आहे.

या अगोदर प्रा. जावेद पाशा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे साहित्य संमेलन, १९९२ साली अजीज नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे पार पडले होते. आता पुन्हा दहावे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान नागपूरला मिळाला आहे.

या संमेलनासाठी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा.

मुख्य संयोजक, प्रा. जावेद पाशा कुरेशी, 

नागपूर - 8459563489 / 9422154223

डॉ. इ. जा. तांबोळी, उपाध्यक्ष 9890919118

अय्यूब अ. लतीफ नल्लामंदू, सचिव 9766819981

हसीब नदाफ, खजिनदार 93266264088

...........................

📙 अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचा आजवरचा प्रवास 

१९९० स्थापना

सोलापूर-पहिले साहित्य संमेलन

संस्थापक कार्यकरी मंडळ

 डॉ. अजीज नदाफ

 मरहुम प्रा. फखरोद्दीन बेन्नूर

स्व. डॉ. मीर इस्हाक शेख

स्व. पत्रकार लतीफ नल्लामंदू

कवी मुबारक शेख.

भाई विश्वासराव फाटे

---------------

२३,२४ मार्च १९९०

१) पहिले संमेलन सोलापूर

प्रा. फ. म. शहाजिंदे,(औराद)

२) दूसरे-१९९२ नागपूर

प्रा. डॉ. अजीज नदाफ (सोलापूर)

३) तिसरे-१९९३  रत्नागिरी

कवी ए. के. शेख ( पनवेल )

४) चौथे-पुणे १९९४

प्रा. फ. ह. बेन्नूर (सोलापूर)

५) पाचवे-१९९७ मुंबई

मरहुम जुल्फी शेख (नागपूर)

६) सहावे- २००० नाशिक

कवि खलील मोमीन 

७) सातवे-२००२

बशीर मुजावर 

८) आठवे संमेलन-२००९ औरंगाबाद 

इक्बाल मिन्ने

९) नववे संमेलन-२०२३ नाशिक

अब्दुल कादर मुकादम (मुंबई)

१०) दहावे सम्मेलन- नागपूर 

येथे १९, २० एप्रिल २०२५ ठरले असून त्याची तयारी चालू आहे.

To Top